फोंडाघाट बाजारपेठेत फ्रिस्टाईल मारामारी

कणकवली (प्रतिनिधी) : ऑनलाइन पेमेंट च्या वादातून फोंडाघाट बाजारपेठेतील हॉटेलमालक आणि ग्राहक यांच्यात वादावादी झाली. मुद्याचे रूपांतर गुद्द्यांत झाले आणि प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोचले. फोंडाघाट बाजारपेठेत एका हॉटेलमध्ये लगतच्या गावातील इसमाने खरेदी केली.त्याचे पेमेंट पेटीएम ने केले.मात्र ऑनलाइन पेमेंट चा मेसेज हॉटेल मालकाला आला नाही, म्हणून ग्राहकाकडून रोखीने पेमेंट घेत उद्या बँकेत जाऊन चौकशी करतो आणि पेमेंट आले असल्यास आपली रोख रक्कम परत देतो असे हॉटेलमलकाने सांगितले.बँकेत पैसे जमा झाल्याची खात्री झाल्यावर हॉटेल मालकाने संबंधितांना तसे मोबाईलवर कळवून रोख दिलेली रक्कम परत नेण्यास संगीतले. मात्र ही रक्कम परत घेण्यासाठी त्या ग्राहकासोबत आणखी काहीजण आले आणि त्यानी हॉटेल मालकाशी हुज्जत घातली. त्यानंतर हुज्जत घालणाऱ्या ला प्रसाद देण्यात आला. या घटनेनंतर त्या ग्राहक आणि सोबत्यांनी आपले गाव गाठत आणखी काहीजणांसह पुन्हा फोंडाघाट बाजारपेठेत येत त्या हॉटेलमालकाशी पुन्हा शाब्दिक वाद केला. शाब्दिक वादाचे रूपांतर गुद्द्यात झाले. अखेर हे प्रकरण कणकवली पोलीस ठाण्यात पोचले आणि दोन्ही बाजुंनी क्रॉस अदखलपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

error: Content is protected !!