बांदा (प्रतिनिधी) : मडूरा बाबरवाडी येथील प्रेमकुटीर आश्रमामध्ये बुधवार २९ जुलै रोजी ‘गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यनिमित्त सकाळी ५.३० वा. काकड आरती व ध्यान, ८.४५ वा. भजन आणि अभंग, ९ वा. पादुका पूजन, गुरुगीता, सर्व चराचर, शिव महिम्न स्तोत्र, आरती, १०.१५ वा. ग्रंथवाचन दासबोध, सद्गुरू स्तवन, शुद्धज्ञान निरूपण व ग्रंथवाचन, १०.४५ वा. ‘स्वयमानुभवाचा महत्वाचा सिद्धांत’ या प्रकरणावर चर्चा होईल. ११.४५ वा. श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराजांचे प्रवचन, दुपारी १२.३० वा. दुपारचे भजन, आरती व महाप्रसाद होईल.
सायंकाळी ४.३० वा. भजन आणि अभंग, ५ वा. ग्रंथवाचन दासबोध व सुलभ आत्मज्ञान ग्रंथवाचन, ६ वा. श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराजांचे प्रवचन,सायंकाळी ७ वा. सायं आरती, रात्री ८ वा. महाप्रसाद, ८.३० वा. रात्रीचे भजन व आरती होईल. सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.












