डोंगरपाल श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव

​बांदा (प्रतिनिधी) : प.पू. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नवनीतानंद महाराज स्थापित डोंगरपाल – डिंगणे येथील श्रीस्वामी समर्थ सेवा मठामध्ये बुधवार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कायक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

​यनिमित्त ​सकाळी ९ वा. श्री स्वामी पादुकांवर अभिषेक, १० वा. होम-हवन, ​दुपारी १२ वा. महाआरती, त्यानंतर महाप्रसाद होईल. ​सायंकाळी ५ वा. हरिपाठ, ६ वा. श्री राष्ट्रोळी भजन मंडळ दोडामार्ग यांचा भजनाचा कार्यक्रम, ​रात्री ८ वा. आरती, ९ वा. पालखी प्रदक्षिणा होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!