शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आ. दीपक केसरकर, शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्याकडून मोपा विमानतळावर उत्स्फूर्त स्वागत

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून, ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक व्यवस्था, विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधा तसेच शाळांमधील विविध उपक्रमांचा आढावा घेणार आहेत.मंत्री दादा भुसे यांचे ६ ऑक्टोबर रोजी रात्री मोपा विमानतळावर आगमन झाले. यावेळी कुडाळ-मालवणचे आमदार दीपक केसरकर आणि शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी त्यांचे मोपा विमानतळावर स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी मंत्री दादा भुसे यांचे केलेले स्वागत विशेष ठरले. सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न, शाळांच्या गरजा आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंत्री भुसे यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आग्रे यांनी मंत्री भुसे यांचे स्वागत करत जिल्ह्यातील शैक्षणिक विषयांबाबत सकारात्मक संवाद साधला.‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शाळांना केवळ प्रशासकीय पातळीवरून नव्हे, तर प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन तेथील परिस्थिती समजून घेण्यावर भर देण्यात येत आहे. या अभियानामध्ये शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता, भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षकांचे कामकाज, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच शाळांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतला जात आहे.

error: Content is protected !!