स्वामी समर्थाच्या सेवेमध्ये खूप मोठी ताकद…

मनीष दळवी; श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाचा पायंडा कायम राहावा…

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ​स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये आणि नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद असून, निष्ठेने केलेली सेवा मानवाला सर्व संकटांतून मार्ग दाखवते, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. दरम्यान श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या माध्यमातून राबविण्यात येणारे धार्मिक व सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. हा पायंडा असाच सुरू राहावा, अशाही शुभेच्छा त्यांनी दिल्या.

येथील श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या माध्यमातून विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सावंतवाडीचे नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, निवृत्त दुय्यम निबंधक स्नेहल तेरेगावकर, सावंतवाडीतून नुकतेच बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार मनोज राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी त्यांचा श्री. दळवी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री.दळवी पुढे म्हणाले, स्वामी सेवेमुळे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात सुख-शांती लाभते,आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात आध्यात्मिक भक्ती मानवाला मनःशांती आणि धैर्य प्रदान करते. स्वामींची सेवा ही केवळ कर्मकांड नसून तो माणसाला सन्मार्गावर नेणारा एक मार्ग आहे. श्री औदुंबर स्वामी मंदिर समितीच्या माध्यमातून सुरू असलेले सामाजिक आणि धार्मिक उपक्रम हे कौतुकास्पद आहेत. या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा बजावणारे अधिकाऱ्यांचा करण्यात आलेला सत्कार कौतुकास्पद आहेत. या ठिकाणी कार्यरत असताना प्रामाणिकपणे आपले काम करणाऱ्या श्री. चव्हाण, तेरेगावकर व राऊत या अधिकाऱ्यांचे सन्मान करून मंदिर समितीच्या माध्यमातून त्यांना कामाची पोचपावती देण्यात आली, हे कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.

नव्याने हजर झालेल्या श्री. भागवत आणि मगदूम या अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्याकडून सावंतवाडीकारांना अपेक्षित असलेले काम व्हावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी उत्सव समितीचे पदाधिकारी अमोल टेंबकर, भुवन नाईक, हेमंत पांगम, मृणाल पावसकर, सचिन मोरजकर, आनंद काष्टे, यश गाटे, प्रशांत सावंत, ओम टेंबकर, नागेश पाटील, यश तांडेल हर्ष जाधव, अदिती चव्हाण, आर्या टेंबकर, आराध्या मोरजकर, भारती नाईक, भगवान नाईक, हनुमंत धोत्रे, गुरुदास मठकर, हेमांगी माने, रंजना निर्मळ, रश्मी गोसावी, मनाली राऊत, अदिती सावंत, सुरेखा पवार, पूजा धोत्रे, नमिता गवस, संजना गाटे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!