खारेपाटण पंचशील नगर येथील अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा

“नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी”- सौ प्राची ईसवलकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : “आईचे दूध हे बाळासाठी अमृत असून स्तनदा माता व नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे भावपूर्ण उदगार जिल्हा परिषद सदस्या प्राची ईसवलकर यांनी जागतिक स्तनपान दिना निमित्त खारेपाटण पंचशील नगर येथील अंगणवाडी केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमता मार्गदर्शन करताना काढले.”

जागतिक स्तनपान दिना निमित्त दि.१ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन सर्वत्र करण्यात आले असून खारेपाटण क्षेत्रातील येणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मिळून गुरुवार दि.६ ऑगस्ट २०२६ रोजी खारेपाटण पंचशील नगर अंगणवाडी केंद्र क्र.४ येथे स्तनपान सप्ताहाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला खारेपाटण मतदार संघाच्या जिल्हा परिषद सदस्या व महिला बाल कल्याण समितीच्या सदस्य प्राची ईसवलकर, खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या आरोग्य सेविका श्रीम.काटकर, श्रीम.दुखंडे, प्रमिला पाटणकर, खारेपाटण पंचशील नगर केंद्राच्या अंगणवाडी सेविका सविता पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच या कार्यक्रमाला खारेपाटण रामेश्वर नगरच्या अंगणवाडी सेविका प्रतीक्षा ढेकणे, संभाजी नगर गुरववाडी अंगणवाडी सेविका निशा ब्रम्हदंडे, हसोळटेंब – कोंडवाडी अंगणवाडी सेविका शीतल कापसे, खारेपाटण केंद्र शाळा नं.१ अंगणवाडी सेविका निकिता राऊत, खारेपाटण बंदरगाव अंगणवाडी सेविका तरनुम ठाकूर, खारेपाटण काझीवाडी अंगणवाडी सेविका रुक्सना सारंग तसेच आशा स्वयंसेविका माधवी कांबळी, अंकिता कांबळी, शिल्पा मेस्त्री, समृद्धी पाटील आणि गरोदर माता, स्तनदा माता व पालक वर्ग उपस्थित होते.

यावेळी आरोग्य सेविका श्रीम काटकर यांनी स्तनदा मतांना स्तनपाना विषयी व बाळाच्या घ्यावयाच्या आरोग्य विषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले. तर आरोग्य सेविका प्रमिला पाटणकर यांनी ऑनलाइन लिंक द्वारे गरोदर माता व स्तनदा माता यांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अर्धवार्षिक वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. तर गरोदर मातांची ओटभरणी कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने करण्यात आला.यावेळी उपस्थित स्तनदा मातांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता राऊत, तर आभार श्रीम.कापसे यांनी मानले.

error: Content is protected !!