गोवा बनावटीची दारू वाहतूक एक्साईज इन्सुली चेकपोस्ट पथकाने पकडली

इनोव्हा कारसह १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त

बांदा (प्रतिनिधी) : बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी ठाणे येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४ लाख २४ हजार ८०० रूपयाच्या दारूसह गाडी असा एकूण १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रितेश प्रभू म्हात्रे (वय ३५, रा. तुर्भे-ठाणे) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाकडून आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जुना पत्रादेवी बांदा रोडवर आरोसबाग तिठयाजवळ करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास आरोसबाग तिठ्याजवळ संशयित वाहनांची तपासणी केली जात होती. यावेळी संशयितरीत्या जाणाऱ्या राखाडी रंगाच्या टोयोटा इनोव्हा गाडीची पाहणी केली असता, वाहनाच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध बँडचे ३० बॉक्स आढळून आले. या प्रकरणी वाहनचालक आरोपी रितेश प्रभू म्हात्रे (वय ३५ वर्षे, रा. तुर्भे, ठाणे) यास ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत ४ लाख २४ हजार ८०० रुपये किमतीचा अवैध दारूसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ६ लाख रुपये किमतीची इनोव्हा कार असा एकूण १० लाख २४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि सिंधुदुर्ग अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान/वाहन चालक संदीप कदम, तसेच जवान दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, सतीश चौगुले आणि अभिषेक खत्री आदींच्या पथकाकडून करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास इन्सुली तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करत आहेत.

error: Content is protected !!