जिल्हा कबड्डी पंच परीक्षेचा निकाल जाहीर

कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने नुकत्याच कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे घेण्यात आलेल्या जिल्हा कबड्डी पंच परीक्षेचा ९० टक्के निकाल लागला .एकूण २१ परीक्षार्थी पैकी १९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले .सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल ची क्रीडा शिक्षिका ,राष्ट्रीय कबड्डी खेळाडू व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या खेलो इंडिया ट्रेनिंग सेंटरच्या कबड्डी प्रशिक्षिका श्रीमती ऍलिस्का पीटर आल्मेडा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या तर द्वितीय क्रमांकाने क्रीडा शिक्षक म्हणून जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे कार्यरत असलेले व तज्ञ कबड्डी प्रशिक्षक श्री पंकज प्रभाकर राणे उत्तीर्ण झाले आहेत .तर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले कबड्डी प्रशिक्षक श्री दीपक तुकाराम जाधव हे सुद्धा जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल मालवण येथेच कार्यरत आहेत हे कौतुकास्पद आहे.प्राविण्य मिळविलेल्या व उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थींचे अभिनंदन सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने सन्मा.श्री रुजारीओ पिंटो व श्री संजय पेडणेकर,तुषार साळगावकर व पंच मंडळाच्या वतीने केंद्रप्रमुख श्री प्रशांत वारीक व केंद्र समन्वयक श्री वैभव कोंडस्कर यांनी केले आहे .जिल्हा पंच परीक्षा व शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय पंच किशोर पाताडे ,अमित गंगावणे,जयेश परब ,राज्यपंच राजू बंगे ,हेमंत गावडे ,सिताराम रेडकर आदींनी विशेष मेहनत घेतली . विशेष प्राविण्य मिळविलेल्या व उत्तीर्ण झालेल्या परिक्षार्थ्यांचा गुणगौरव व प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा .मराठा हॉल कुडाळ येथे केले जाणार असल्याचे कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी सांगितले .

error: Content is protected !!