शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ विजय मिळवत रचला इतिहास

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : फुटबॉल शौकीनांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळाने केरळचा स्टेट इलेक्ट्रिक सिटी संघावर टायब्रेकरमध्ये ५-४ असा विजय मिळवत शाहू गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा जिंकली. पूर्णवेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्थानिक शिवाजी तरुण मंडळ आणि केरळ स्टेट इलेक्ट्रिक सिटी बोर्ड यांच्यातील सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी होती. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी सुत्रबद्ध चढाया केल्या. केरळा संघाच्या शाॅर्ट पासिंगचा खेळ दर्जेदार होता. शिवाजीच्या अनिकेत जाधवची चढाई केरळाच्या बचाव फळीने रोखली. केरळाच्या अर्जुन व्ही आणि विक्नेशची चढाई शिवाजीने रोखली. १८ व्या मिनिटाला संकेत साळोखेच्या करण चव्हाण बंदरेनै मैदानी गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. शिवाजी गोल केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
खोलीची परतफेड करण्यासाठी केरळाने चढायांचा धडाका वाढवला. निजो गिल्बर्टचा हेड शिवाजीचा गोलरक्षक मयुरेश चौगुलेने रोखला. २७ व्या मिनिटाला केरळाने यशस्वी चढाई केली. विक्नेशच्या पासवर करुन बेबीने सफाईदार गोलची नोंद करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. शिवाजीच्या निखिल कदमने फ्री कीकवर मारलेला वेगवान फटका गोलखांबावरुन गेला. संदेश कासारने गोल नोंदवण्याची सोपी संधी गमावली. मध्यंतरास सामना १-१ असा बरोबरीत होता.

error: Content is protected !!