कुणकेश्वर समुद्रात युवक बुडाला

मित्रांसमवेत पाण्यात पोहत असताना घडली दुर्घटना

देवगड (प्रतिनिधी) : मित्रांसमवेत कुणकेश्वर समुद्रात पोहण्यासाठी गेलेला स्वराज सुनिल पेडणेकर(२०)रा.कुणकेश्वर चांदेलवाडी हा युवक बुडाला.त्याचा मृतदेह गुरूवारी सायंकाळी ४.३० वा.सुमारास सापडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वराज हा मित्रांसमवेत गुरूवारी दुपारी ३.३० वा.सुमारास मारूती मंदीराखाली कुणकेश्वर समुद्रात पोहण्यासाठी गेला होता.चौघेजण पोहत असतानाच स्वराज हा लाटांबरोबर पाण्यात ओढला गेला.मित्रांचा वाचविण्यासाठी आरडाओरड केली मात्र ग्रामस्थ घटनास्थळी धावून येईपर्यंत तो पाण्यात बुडाला.घटनास्थळी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.सर्व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतल्यानंतर तासाभरानंतर त्याचा मृतदेह पोहत असलेल्या ठिकाणी पाण्यात सापडला.

स्वराज हा देवगड कॉलेजमध्ये तेरावीमध्ये शिकत होता.आई, वडील, आजोबा, दोन बहिणी असा परिवार असून वडील हे आंबा बागायतदार आहेत.स्वराजच्या दुर्दैवी निधनाने कुणकेश्वर गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत देवगड पोलिस स्थानकात खबर दिली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!