भुईबवाडा घाटात दरड कोसळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात सलग गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसाने भुईबावडा घाटात रिंगेवाडी पासून अंदाजे ६ कि.मी अंतरावर रविवारी पहाटे भली मोठी दरड कोसळली. त्यामुळे गगनबावडा खारेपाटण राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून जेसिबीच्या साहाय्याने दरड हाटविण्याचे काम सुरु असून एकेरी वाहतूक सुरु झाली आहे.

error: Content is protected !!