अखेर सिंधुदुर्गात ताज हॉटेल होणार!

पालकमंत्री नितेश राणेंकडून वडील माजी मुख्यमंत्री दादांच्या स्वप्नपूर्तीला शुभारंभ

पर्यटन रोजगार निर्मितीला चालना ;भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्रींनी मंत्री नितेश राणेंचे मानले आभार

कणकवलीर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात ताजचे हॉटेल होणार असे आम्ही गेली अनेक वर्षे ऐकत होतो.तारीख पे तारीख असंच काहीस सुरू होत.पण आता ही ३२ वर्षांची प्रतिक्षा संपणार असून आजच मंत्रालयात त्रिपक्षीय करार संपन्न झाला.ताज प्रशासन,राज्य सरकार आणि शिरोडा-वेळागर स्थानिक मंडळात हा करार पार पडला.शिरोडा-वेळागर येथे हे पंचतारांकित हॉटेल होणार आहे.खरतर आजचा दिवस हा सिंधुदुर्गसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे.कारण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषीत झाल्यापासून अनेक वर्षे झाली.आम्हाला हा नेहमी कागदावरचाच पर्यटन जिल्हा वाटत आलाय.नाही म्हणायला थोड्या फार सुधारणा होता आहेत मात्र विदेशी पर्यटक स्थिरावतील अस चित्र,अशा सोयी सुविधा दिसत नव्हत्या.आता पंचतारांकित हॉटेल झाल म्हणजे विदेशी पर्यटक येतील तसेच त्यांना लागणाऱ्या अन्य सोयी सुविधा ही निर्माण होतील असा विश्वास वाटतोय.ताजचे हे मोठे पंचतारांकित हॉटेल (१४२ रूमचे)असून तीन वर्षाच्या आत पूर्ण होईल असा अंदाज आहे.आता आपण फॉरेनरना पण येवा कोकण आपलोच आसा म्हणणार हे मात्र नक्की . ताज प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री , कोकणचे भाग्यविधाते विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या स्वप्नपूर्ती चा शुभारंभ केला असून या अभूतपूर्व योगदानासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आभार मानले आहेत

error: Content is protected !!