कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांकडून 31 मे रोजी बैठकीचे आयोजन
कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीत कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व लाभाचे प्रस्तावा संदर्भात कार्यालयाकडून चाललेला भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत स्वाभिमानी कामगार संघटनेने 22 मे रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांना दिला होता. याची दखल रत्नागिरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त श्री. आयरे यांनी लागलीच घेत दिनांक 31 मे 2023 रोजी दुपारी 2.30 वाजता सरकारी कामगार आधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयात आयोजित करत असल्याचे लेखी पत्र दिल्याने संघटनेने सदरचे आंदोलन दि 31 मे पर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचा न कामगारांच्या निगडित प्रश्नांच्या तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करत असल्याचे लेखी पत्र दिल्याने संघटनेने 31 मे पर्यंत सदर आंदोलन तात्पुरते स्थगित केले केले आहे. ज्या कामगारांचे लाभाचे व नोंदणी/नूतनीकरण प्रस्ताव अद्याव प्रलंबित राहिले आहेत त्यांनी संघटनेशी संपर्क साधून 31 मे 2023 रोजी कामगार अधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.