कणकवली (प्रतिनिधी) : २१ ऑगस्ट प्रतिनिधी : कणकवली परबवाडी येथील रहिवासी संकेत अरविंद बांदेकर (वय ३६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परबवाडी परिसरासह कणकवलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संकेत बांदेकर हे मनमिळाऊ व शांत स्वभावाचे म्हणून परिचित होते. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालविल्याने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रमंडळी तसेच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. शुक्रवारी कणकवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कणकवली परबवाडी येथील संकेत बांदेकर यांचे अल्पशा आजाराने निधन












