पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांचे सामाजिक कार्यकर्ता संदीप चौकेकर यांनी केले अभिनंदन

रायगड येथील शिवनेरी निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना नेते ,मंत्री भरतशेठ गोगावले यांची नुकतीच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री भरतशेठ गोगावले यांचे नवी मुंबई येथे स्थायिक असलेले मूळ कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी खास भेट घेऊन अभिनंदन केले. संदीप चौकेकर यांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी मंत्री गोगावले यांची रायगड जिल्ह्यातील शिवनेरी निवासस्थानी सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री गोगावले यांनीही चौकेकर यांचे हसतमुखाने स्वागत केले.

error: Content is protected !!