फोंडाघाट (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेतील, लाभार्थ्यांसाठी हयात दाखला तयार करण्यासाठी, (डीएलसी) कॅम्प नुकताच, ग्रामपंचायत फोंडाघाटच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. या सर्व लाभार्थ्यांना हयात दाखला ऑनलाइन तयार करणे आवश्यक असल्याने, सुमारे २८ लाभार्थ्यांनी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करून घेतली…
यावेळी सरपंच संजना आग्रे,सहाय्यक महसूल अधिकारी धनंजय सिंगनाथ, मंडल अधिकारी प्रवीण मोंडे,ग्राम विस्तार अधिकारी मंगेश राणे, ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस,आपले सरकार केंद्र व्यवस्थापक गणेश तेली/ मुंडे, सहाय्यक शितल पारकर,महसूल सेवक पांडुरंग राणे आणि असंख्य लाभार्थी उपस्थित होते…












