श्रावण मेळ्यात भक्तिगीतांची सुरेल मैफिल; भजनी व दशावतारी कलावंतांचा सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी यांच्या माध्यमातून श्रावण मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरेल भाव गीत व भक्ती गीतांची मैफिल असलेला संगीत संध्या ही मैफिल आयोजित करण्यात आली होती. त्यासोबत हळवल गावातील भजन मंडळाचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता.

हळवल परबवाडी येथील लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून श्रावण मासाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात सुरवातीला गावातील मूर्तिकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात श्रावण मेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुरेल गीतांची संगीत मैफिल आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात गायक विनय वझे, गायक सागर राठवड, गायिका आर्या आचरेकर यांनी सुमधुर भक्ती गीत गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या मोफिलीत तबला साथ प्रेम मेस्त्री पखवाज साथ गौरव वझे, सतीश गावडे, ताल रक्षक जीवन मेस्त्री यांची साथ लाभली. श्रावण मेळा कार्यक्रम अंतर्गत हळवल गावातील भजन मंडळ व दशावतार मंडळाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भजनी मंडळ व दशावतार मंडळाना भजनी साहित्य देत सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित भजनी कलावंत व दशावतारी कलावंतांनी लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या उपक्रमाचे कोतुक करत मंडळाचे आभार मानले. लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून पुढील काळात स्वच्छता मोहीम व हळवल गावातील सर्व गणेश भक्तांना पूजा साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष लवू परब यांनी सांगितले. यावेळी हळवल मानकरी, गावातील प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उमेश परब यांनी केले तर उपस्थितांचे आभार अरुण राऊळ यांनी मानले

error: Content is protected !!