कणकवली (प्रतिनिधी) : यंगस्टार मित्रमंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्रावणमेळ्याचा उत्साहात समारोप झाला. या मेळ्यानिमित्त रानभाजी पाककला स्पर्धा, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा तसेच आदर्श संगीत विद्यालय, कणकवली यांचा भावगीत व भक्तिगीतांचा ‘सुरसंगम’ हा सुरेल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, गजानन उपरकर गुरुजी, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण व प्रतीक्षा सावंत, भालचंद्र महाराज संस्थानचे व्यवस्थापक विजय केळुसकर, यंगस्टार मित्रमंडळाचे अध्यक्ष अण्णा कोदे, साक्षी वाळके व प्रियाली कोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाककला स्पर्धेचे विजेते
पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया सापळे, द्वितीय क्रमांक स्वरूपा वाळके, तर तृतीय क्रमांक साक्षी आपटे यांनी मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके सौ. पौर्णिमा मांगले व मानसी मेस्त्री यांना देण्यात आली.
वेशभूषा स्पर्धेचे विजेते
वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक सान्वी म्हापणकर, द्वितीय क्रमांक लक्ष्मी वाघमोडे, तर तृतीय क्रमांक कार्तिकी खवरे हिने मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिके तन्वी शिरसाठ व रुद्र म्हापणकर यांना देण्यात आली.
दोन्ही स्पर्धांचे परीक्षण अमित टकले व विवेक वाळके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नंदू वाळके, भैय्या आळवे, नाना कोदे, रवींद्र सावंत, उदय यादव, अमिता राणे, रुपेश वाळके, रुपेश परब, परेश वाळके, संतोष सुतार व तुषार मोये यांनी विशेष मेहनत घेतली.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या भक्तिमय वातावरणात विविध स्पर्धा आणि ‘सुरसंगम’ कार्यक्रमाला नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने श्रावणमेळा संस्मरणीय ठरला.













