भाजपाच्या कणकवली पंचायत समिती सदस्य मानसी मराठे यांची पालकमंत्र्यांकडे मेमु ट्रेनची मागणी !

शालेय एसटी बस सुरू करण्याची साठी विशेष प्रयत्न ! विद्यार्थ्यांमध्ये समाधान !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली ते गोवा या कोकण रेल्वे मार्गावर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवा- युवती तसेच व्यावसायिक कामा- नोकरी निमित्ताने, दररोज गोवा राज्यात ये – जा करतात.ते सध्या महामार्गानेच प्रवास करतात. त्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. तसेच वाढती वाहतूक व अपघाताचा धोका यामुळे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रवास हा सुरक्षित, वेळेची बचत करणारा आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारा पर्याय आहे …

त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कणकवली ते गोवा ते कणकवली या मार्गावर मेमु(mainline electric multipal unit) विजेवर चालणारी लोकल प्रवासी ट्रेन सुरू करण्यात यावी. अशी कार्यवाही व आग्रही मागणी, भाजपाच्या कणकवली पंचायत समिती सदस्य सौ. मानसी बाळकृष्ण मराठी (लोरे नंबर एक) यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे. ..

शालेय एसटी बस साठी प्रयत्न
फोंडाघाट हायस्कूल मधील उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना, घरी परतण्यासाठी सकाळी ११:४५ ची बस चुकते. ती वेळ बदलून सदरची बस १२:३० ला करावी. याकरिता सौ. मानसी मराठे यांनी एसटी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुलांचा संपूर्ण दिवस गाडी अभावी स्टैंड वर जाऊन नुकसान होते.ही बाब त्यांनी निदर्शनास आणून देताना, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटच्या मुख्याध्यापकांचे पत्र सादर केले. त्यामुळे या गाडीच्या वेळेत बदल करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली.याबद्दल युवा वर्गात समाधान व्यक्त होत आहे..

error: Content is protected !!