कणकवली तालुकास्तरीय विज्ञान नाटिका, भूमिकाभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुकास्तरीय विज्ञान नाटिका तसेच राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्पांतर्गत भूमिकाभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे नियोजित स्थळ व दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये शाळांनी संघ व स्पर्धकांसह वेळेत उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय, हरकुळ बुद्रुक येथे होणार आहे. शासनमान्य शाळांमध्ये नियमित शिकणारे इयत्ता सहावी ते दहावीचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.विज्ञान नाटिकेच्या एका संघात जास्तीत जास्त आठ विद्यार्थी/विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतील.

त्यानंतर राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत कणकवली तालुकास्तरीय माध्यमिक भूमिकाभिनय व लोकनृत्य स्पर्धा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत कणकवली महाविद्यालयातील HPCL हॉल, कणकवली येथे होणार आहे. एकाच दिवशी सकाळ व दुपारच्या दोन सत्रांत भूमिकाभिनय आणि लोकनृत्य या दोन स्वतंत्र विषयांच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचे नियम व अटी संबंधित परिपत्रकानुसार राहतील.
दरम्यान, या स्पर्धांची अंतिम जिल्हास्तरीय फेरी बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथे होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत एकाच दिवशी दोन्ही सत्रांत भूमिकाभिनय व लोकनृत्य स्पर्धा पार पडतील.

अधिक माहितीसाठी गटशिक्षणाधिकारी कणकवली किशोर गवस या तिन्ही स्पर्धांसाठी संबंधित शाळांनी आपले संघ व स्पर्धक नियोजित स्थळी वेळेत उपस्थित ठेवून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!