नांदगाव पंचक्रोशीतील शाळांमध्ये वह्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ; प्राणजीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वह्या वाटपाच्या उपक्रमात मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो आम्हाला दिसत आहे. मुलांची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा विकास होण्यासाठी हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी हा वह्या वाटपाचा उपक्रम होत आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात पत्रकार भगवान लोके यांच्या प्रमाणे आपल्या लाल मातीबद्दल मोठे झाल्यानंतर नेहमी आत्मियतेने जिव्हाळा जपला पाहिजे. त्यातून असे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम होतात.शैक्षणिक उपक्रमातून प्राण जीवन संयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थांनी केलेली गुंतवणूक आदर्शवत असल्याचे प्रतिपादन सभापती हर्षदा वाळके यांनी केले.
प्राणजीवन संयोग संस्थेचे अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या सहकार्याने व शिवशक्ती मल्टिस्पेशालिटी सर्व्हिसेस संचलित जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकाराने नांदगाव पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम शुभारंभ कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच सचिन परब, नांदगाव उपसरपंच इरफान साटविलकर , माजी उपसरपंच निरज मोरये, व्हा. चेअरमन दयानंद हडकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रमोद लोके, माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, प्रदीप हरमलकर, सोसायटी संचालक परशुराम परब, शत्रुघ्न डामरे , उदय परब, सचिन लोके, माजी सरपंच सुनीता लोके, मारुती मोरये , पत्रकार ऋषिकेश मोरजकर , सचिन राणे , उत्तम सावंत, संतोष परब,रघुनाथ लोके, प्रवीण डगरे, अनिल नरे, महेश लोके, गोविंद लोके, पंकज आचरेकर, मनोज लोके, ग्रा.प.सदस्य आनंद तांबे, बाळकृष्ण परब, विजय खरात, रुपेश खरात, वासुदेव दळवी, प्राण जीवन सहयोग संस्थेचे प्रतिनीधी मनोज राणे, अनिप सावंत, सिध्देश सावंत, कृष्णा वायंगणकर, रज्जाक बटवाले, राजा नावलेकर, भूपेंद्र मोरजकर ,पपी वायंगणकर, मुख्याध्यापक दिनेश जंगले , शिक्षिका रश्मी कुडतरकर यांच्यासह नांदगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ , विद्यार्थी , शिक्षक उपस्थित होते.
सभापती हर्षदा वाळके म्हणाल्या, आपल्या परिसरातील गावांना न्याय देण्याच्या भूमिकेने पत्रकार भगवान लोके काम करत आहेत. त्यांची आपल्या लाल मातीबद्दल नेहमी विविध प्रश्नांमधून तळमळ दिसून येत आहे. आपल्या गावामध्ये काहीतरी नवीन गोष्टी व्हाव्यात. या उदात्त हेतूने वह्या वाटप हा कार्यक्रम त्यांच्या पुढाकारातून होत आहे. बघितलं तर पूर्ण गाव आपल्या सोबत आहे, हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. असलदे गावाचं हे भाग्य आहे, भगवान लोके यांच्यासारखी व्यक्ती गावामध्ये तुम्हाला लाभलेली आहे. त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून पूर्ण गावात एकजुट उभी केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भल्या भल्या गावांमध्ये दारूबंदी होत नाही. कारण कितीही प्रयत्न केले, कितीही ग्रामसभा केल्या तरीही दारूबंदी होत नाही, पण दारु बंदी असलदे गावाने करुन दाखवली आहे. असलदे गावात जमिन विक्रीवर आणलेली बंदी इतर गावांसाठी आदर्शवत आहे.
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर म्हणाले, प्राण जीवन सहयोग संस्था यांच्या माध्यमातून या संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांच्या पुढाकारातून हा वह्या वाटपाचा कार्यक्रम होत आहे. सर्वसत्ता आपल्याकडे आहेत, तुम्हाला कसलाही गोष्टीची गरज लागेल तुम्ही कधीही आमच्याकडे हक्काने मागणी करू शकता. शासनाने शैक्षणिक ग्रामसभा घेण्याचा निर्णय जो सांगितलेला आहे त्याचा उद्देश हाच आहे. मुलांच्या ज्या गरजा आहेत त्या आमच्या पर्यंत पोहोचला पाहिजेत. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात यशस्वी विद्यार्थी बनून गावाबद्दल आत्मियता ठेवावी. मी सरपंच आहे , त्यामुळे निरपेक्ष काम करत आहे.
भगवान लोके म्हणाले, प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी शैक्षणिक कामाला चालना देण्यासाठी नांदगाव पंचक्रोशीमध्ये प्राथमिक व हायस्कुल शाळांसाठी चांगल्या दर्जाच्या वह्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्या गावात जन्म घेतला त्या लाल मातीबद्दल आत्मियता ठेवून काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. असलदे गावात जमिन विक्री बंदी, दारु बंदी किंवा काही सामाजिक प्रश्न घेवून आम्ही लढताना संपूर्ण गाव माझ्या पाठीशी राहत असल्याचा अभिमान आहे. सोसायटीच्या माध्यमातून उभं केलेलं काम घराघरांपर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळेच आपल्या भागासाठी जे काही करता येईल त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
या वह्या वाटप कार्यक्रमात पूर्ण प्रा. शाळा नांदगाव – असलदे, नांदगाव शाळा नं.1 , नांदगाव उर्दु शाळा याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.










