खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते रफीक नाईक यांच्या सौजन्याने शेर्पे केंद्राअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व शालेय विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक यांना नुकतेच मंगळावर दि.२५ ऑगस्ट २०२५ रोजी गोड व रुचकर मोदकाचे वाटप करण्यात आले.
दरम्यान शिष्यवृत्ती सराव परीक्षेसाठी शेर्पे येथे केंद्र शाळेमध्ये इतर शाळांमधून आलेल्या ३० विद्यार्थ्यांना देखील गोड मोदकाचे वाटप करण्यात आले. तसेच नडगिवे, शेर्पे, शिडवणे इत्यादी जि.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोदक वाटप करण्यात आले. तर शालेय विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेले मोदक खूप छान, रुचकर व स्वादिष्ट होते. अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. तर शाळेच्या वतीने रफीक नाईक यांचे आभार मानण्यात आले.












