खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी खारेपाटण येथील शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते सुहास राऊत यांची नुकतीच ग्रामसभेत निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळावर दि.२५ ऑगस्ट २०२६ रोजी सरपंच महेंद्र गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जि. प. सदस्या प्राची ईसवलकर, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर ढेकणे, जयदीप देसाई, किरण कर्ले, अस्ताली पवार, शिवसेना शिंदे पक्षाचे तालुका प्रमुख मंगेश गुरव, शिवसेना उभाठा पक्षाचे तालुका प्रमुख महेश कोळसुलकर, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू कोरगावकर रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, भाजप कार्यकर्ते राजेंद्र वरुणकर, इस्माईल मुकादम, तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी विशाल वरवडेकर. यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण गाव तंटामुक्त समितीची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष सुहास राऊत यांचे सरपंच महेंद्र गुरव आणि उपस्थित मान्यवरांनी यांनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले. व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












