वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे गावठणवाडी येथील बारावीत शिकणारी मुलगी करुणा प्रकाश वळंजू वय १७ हिचा उपचारादरम्यान ओरोस येथे निधन झाले आहे. कुमारी करुणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती मागील दोन दिवस ती सर्दी तापामुळे आजारी होती. तिच्यावर वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तिची प्रकृती नाजुक असलयाने त्याच दिवशी तिला ओरोस जिल्हा रुग्नालयात पाठविण्यात आले तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले मात्र तिची प्रकृती अधिकच नाजूक झाल्याने तिला बांबोळी गोवा घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगण्यात आले. मात्र पुढे नेण्यापूर्वीच तिचा तेथे मृत्यू झाला. करुणा हिच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात आई-वडील बहिण भाऊ काका काकी असा परिवार आहे.
कोकिसरे गावठणवाडी येथील करुणा प्रकाश वळंजू हिचा उपचारादरम्यान मृत्यू












