‘एक पेड़ माँ के नाम’ अभियानाला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान अंतर्गत आयोजित भव्य वृक्षारोपण सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

न्यू इंग्लिश स्कूलच्या बाजूला, सिंधुदुर्ग नगरी, ता. कुडाळ येथे सकाळी १० वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात मा. जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे मॅडम (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया ताई वालावलकर, समाजसेवक व उद्योजक संतोष वालावलकर तसेच ओरोस ग्रामपंचायत सदस्य राजश्री नाईक, भक्ती पळसंबकर, वनिता जुवेकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे मॅडम यांनी न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्टच्या पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक केले आणि ‘प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे’ असे आवाहन केले. व संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष बेंजामिन गोम्स यांनी भूषवले, तर सूत्रसंचालन राजन भगत यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!