बांदा (प्रतिनिधी) : कै. डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर यांचे १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. व्ही. एन नाबर इं. मि. स्कूल, बांदा तर्फे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी गव्हर्निंग कौन्सीलचे सदस्य, शशी पित्रे , राजेश गोवेकर त्याचप्रमाण शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील नाटेकर, तसेच पालक संघाचे सदस्य गजानन गायतोंडे. व तुषार कानसे उपस्थित होते. सदर शोकसभेस शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, शिल्पा कोरगांवकर, रसिका वाटवे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विदयार्थी उपस्थित होते.
‘सेवा करा पण तिचा गाजावाजा करू नका’ ही शिकवण त्यांनी पुढील पिढीला दिली. त्यांचे विचार तसेच त्यांच्या आठवणी मनाली देसाई यांनी आपल्या मनोगतातून सांगितल्या. राजेश गोवेकर व सुनील नाटेकर व गजानन गायतोंडे यांनीही डॉ. अरविंद खानोलकर यांच्याबद्दल आपल्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली.











