कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी
कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता जनतेच्या गाठीभेटी घेणार आहेत. तसेच नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.












