कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, हडपिड येथे श्रावण महिन्यातील गुरुवारनिमित्त १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे आयोजन स्वामी भक्तांच्या सहभागातून करण्यात आले. महाअभिषेकाच्या निमित्ताने मठात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. १०१ स्वामी भक्तांनी सामूहिकरित्या श्री स्वामी समर्थांच्या चरणी अभिषेक अर्पण करून स्वामींचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, विनोद आईर, दिलीप आईर, प्रदीप हरमलकर, विजय राणे, सचिन अदम, अनिल नरे, शिवलिंग जंगम यांच्यासह मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते.
श्रावण गुरुवारच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक महाअभिषेक सोहळ्यामुळे हडपिड परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक व स्वामी भक्तांनी विशेष परिश्रम घेतले.









