खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील इयत्ता ५ वी मधील एकूण आठ विद्यार्थ्यांनी शैशणिक वर्ष सन २०२२ – २३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये खारेपाटण हायस्कूलच्या रूद्र राजू गर्जे याला ३०० पैकी २७८ गुण ( ९२.६६ टक्के ) मिळाले. अर्णव प्रवीण कासार याला ३०० पैकी २५२ गुण (८४.०० टक्के) मिळाले.अभिनव लक्ष्मीकांत हरयाण याला ३०० पैकी २२८ गुण (७६टक्के) मिळाले. तर रेवान अनंत राऊळ या विद्यार्थ्याला ३०० पैकी २६२ गुण (८७.३३ टक्के) मिळाले.व कुमारी संस्कृती संगाप्पा गुरव या विद्यार्थिनीला ३०० पैकी २४२ गुण (८०.६६ टक्के ) मिळाले. तर जय प्रशांत सुतार (१७२ गुण),रितेश गोरक्षनाथ गायकवाड (१४८ गुण),कु. अनुष्का विनोद सुतार (१३८ गुण ) मिळवून यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे सचिव – श्री महेश कोळसुलकर शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप सर पर्यवेक्षक श्री गुरसाळे सर तसेच सर्व संचालक मंडळ सदस्य आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व मार्गदर्शक शिक्षक यांनी विशेष अभिनंदन केले आहे.













