धामापूर तलाव परिसरात साफसफाई मोहीम 

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभाग सिंधुदुर्ग , ग्रामपंचायत धामापूर यांचा संयुक्त उपक्रम . 

निसर्गप्रेमी ” स्यमंतक ” संस्थेचाही सहभाग . 

चाैके (प्रतिनिधी) :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनपरिक्षेत्र कुडाळ अखत्यारीत मालवण परिमंडळ धामापूर तलाव व श्री देव कासार टाक्का मंदिर परिसरात वनविभागाने कुडाळ वनशेत्रपाल अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अविघटनशील प्लास्टिक घनकचरा गोळा करून साफसफाई मोहीम राबवित स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच श्रमदानातून दोन अनगड बंधारे देखील वनविभागाकडून बांधण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेत मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक कांदळगाव संजीव जाधव , वनरक्षक काडावल सरदार मनेर , वन कर्मचारी अनिल परब यांच्यासह धामापूर सरपंच मानसी परब, उपसरपंच रमेश निवतकर , महेश परब , स्थानिक ग्रामस्थ तसेच निसर्गप्रेमी स्यमंतक युनिव्हर्सिर्टी ऑफ लाईफ या संस्थेचे सदस्य सहभागी झाले होते 

यावेळी वनपाल श्री. परीट म्हणाले धामापूर गावास ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. धामापूर तलाव परिसर निसर्गसंपन्न असून जैवविविधतेने नटलेला आहे. त्याच्या संरक्षण आणि संवर्धन सर्वांची जबाबदारी आहे. वनक्षेत्रामध्ये कचरा करणे हा भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये दंडनिय अपराध आहे. वनक्षेत्रामध्ये कचरा करताना कुणी आढळ्यास वनविभागाला माहिती द्यावी. तसेच श्री देव कासारटाका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्थळाचे पवित्र राखून कचरा करू नये असे आवाहनही वनविभाग मार्फत केले.

error: Content is protected !!