पुरळमध्ये उबाठा सेनेला धक्का; पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री तावडे यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी झाला पक्षप्रवेश

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश येथे पुरळ येथील उबाठा सेनेच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे, संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश पुरळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पुरळ परिसरात उबाठा सेनेला धक्का बसला असून भाजपची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत तिघांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावेळी पालकमंत्री राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे आवाहन केले.

या पक्षप्रवेशावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश (बंड्या) नारकर, भाजप जिल्हा सचिव संदीप साटम,ओबीसी मंडल अध्यक्ष भूषण पोकळे, जिल्हा परिषद गटनेते संजय बोबडी, पंचायत समिती सदस्य अंकुश ठुकरूल, वाडा सरपंच सुनील जाधव, मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, गौरव बोबडी तसेच मंडल प्रभारी डॉ. अमोल तेली,अमित साटम, मिलिंद साटम, फरीद काझी आदी उपस्थित होते.

पुरळ परिसरातील स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी काळात पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या त्याचा फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तावडे यांच्या प्रवेशामुळे तेथील उबाठाची सत्ता संपली आहे. पक्षाच्या विचारधारेनुसार आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली परिसराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी प्रवेशकर्त्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!