ग्रामपंचायत आणि घरकुल संकुलची केली पाहणी
कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल मॅडम सिंधुदुर्ग जिल्हा दोऱ्यावर आले असता कलमठ ग्रामपंचायतला भेट देत विविध उपक्रमांची माहिती घेत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल संकुलची पाहणी केली. आपण एका विकसित आणि उपक्रमशील ग्रामपंचायतला भेट दिल्याचा आनंद असून ग्रामपंचायतने साकारलेल्या एकत्रित ‘घरकुल संकुल प्रकल्प’ हा कौतुकास्पद असून ग्रामविकासाला दिशादर्शक असून आपण आज इथे आलो नसतो तर एका उपक्रमशील ग्रामपंचायतला भेट देण्याचे राहून गेल असत, त्यामुळे यासाठी कलमठ ग्रामपंचायतचे विशेष कौतुक असल्याचे यावेळी विभागीय आयुक्त रुबल अगरवालजी यांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम,. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना निवासी एकत्रित संकुल माहिती सरपंच संदिप मेस्त्री यांनी देऊन स्वागत केले.कलमठ गावात विभागीय आयुक्त येणे ही गावासाठी अभिमानाची बाब असून ग्रामपंचायतने घेतलेल्या मेहनतिचे बक्षीस आहे असे सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, उपमुख्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रांतधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे,गणेश महाडिक,सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर, दिनेश गोठणकर, अनुप वारंग, नितीन पवार, सचिन खोचरे, हेलन कांबळे, श्रेयस चिंदरकर, स्वाती नारकर, इफत शेख, नजराणा शेख, तेजस लोकरे, बाबू नारकर, तलाठी गोजीरी गोडे, ग्रामपंचायत अधिकारी नावदेव तळवडेकर उपस्थित होते.
ग्रामपंचायत नावीन्यपूर्ण उपक्रम,. प्रधानमंत्री घरकुल आवास योजना निवासी एकत्रित संकुल माहिती सरपंच संदिप मेस्त्री यांनी देऊन स्वागत केले.कलमठ गावात विभागीय आयुक्त येणे ही गावासाठी अभिमानाची बाब असून ग्रामपंचायतने घेतलेल्या मेहनतिचे फळ आहे असे सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.











