आमदार निलेश राणेंनी केले अभिनंदन
कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणेंचे एकनिष्ठ शिवसैनिक विजय मऱ्याप्पा इंगळे यांच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी देत युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. इंगळे यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.आमदार निलेश राणे यांनी विजय इंगळे याना कोकण विभागाचे युवा सचिव विकास भरतशेठ गोगावले यांनी दिलेले नियुक्तीपत्र स्वहस्ते दिले. विजय इंगळे हे आमदार तथा माजी खासदार निलेश राणेंचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून सुपरिचित आहेत. काँग्रेस स्वाभिमान पक्ष ते भाजपा आणि आता शिंदे शिवसेना या राजकीय प्रवासात विजय इंगळे हे आमदार निलेश राणे यांच्याशी पक्षापलीकडेही एकनिष्ठ राहिले.
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली , पूर्वेशभाई सरनाईक यांच्या आदेशानुसार आणि युवासेना कोकण विभाग सचिव विकास भरतशेठ गोगावले यांच्या सूचनेनुसार विजय इंगवले यांची कणकवली देवगड वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.









