फोंडाघाट (प्रतिनिधी) : एकीकडे प्रवाशांच्या सुख सोयीसाठी मुंबई आणि इतर राज्यातून गणेशोत्सवासाठी, कोकणाकडे असंख्य ST गाड्या/ रेल्वे आणि इतर वाहने याकडून येणारा कोकणवासीयांचा लोंढा ! या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्थानकावरून वाड्या- वाड्यावर जाणाऱ्या नेहमीच्या लोकल ST हे चाकरमान्यांचे एकमेव साधन आहे. मात्र वेगवेगळ्या घोषणा करून, आपण लोकांचे किती तारणहार आहोत ? दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करताना, सिक्स सीटर, खाजगी वाहतूकदार यांना प्रोत्साहन दिल्याचे जाणवते. त्यामुळे येणारे चाकरमानी आणि लोकल सेवा देणाऱ्या ST बद्दल प्रवासी आणि ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.लोकल गाड्या बंद करून खाजगी आणि इतर सिक्स सीटर यांच्यासाठी खाजगीकरणाचा हा प्रयत्न खचितच निषेधार्य आहे. याचा विचार स्थानिक ग्रामपंचायत, संस्था, एनजीओज लोकप्रतिनिधी आणि प्रवासी – ग्रामस्थांनी करावा. अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून ग्रामस्थांकडून होत आहे. अन्यथा ऐन सणाच्या दिवशी प्रक्षोभास प्रशासनास सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कणकवली व स्थानिक स्थानकावरून एसटीच्या वाड्या वाड्यावर जाणाऱ्या लोकल फेऱ्या बंद ! चाकरमानी प्रवाशांचे संताप !












