खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण वरचे स्टँड येथे हायवेवर गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवरून येणाऱ्या गणेशभक्त प्रवासी चाकरमान्यांसाठी ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या सार्वजनिक सुलभ शौचालयाचे उद्घघाटन आज शुक्रवार दि.११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांच्या शुभ हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. या सार्वजनिक शौचालय शुभारंभ प्रसंगी माजी जि.प. सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,खारेपाटण माजी सरपंच रामकांत राऊत, माजी उपसरपंच इस्माईल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष सुहास राऊत, खारेपाटण ग्रा पं. सदस्य सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, शमशुद्दीन काझी, सुरेंद्र कोरगावकर,ग्रामपंचायत लिपिक अनिकेत गुरव ग्रामपंचायत कर्मचारी उमेश राऊत,अजय तेली आदी मान्यवर पदाधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण वरचे स्टँड येथे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना शौचालयाची व्यवस्था नव्हती.त्यामुळे महिला,ज्येष्ठ नागरिक व सर्वसाधारण नागरिक यांची खूप मोठी अडचण होत होती.मात्र ही बाब खारेपाटण ग्रामपंचायतीच्या निदर्शनास येताच येथे कायमस्वरुपी शौचालयाची इमारत बांधून विशेष करून मुंबईकर चाकरमानी व सर्वच नागरिकांची सोय केल्याबद्दल खारेपाटण गावचे सरपंच महेंद्र गुरव यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.













