संपूर्ण भारतातून ८६१ वी रॅंक प्राप्त
चौके ( प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडीचा सुपुत्र तुषार दिपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून संपूर्ण भारतातून ८६१ वी रॅंक प्राप्त केली आहे. तुषार पवार हा सामान्य कुटूंबातील असून त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदीविक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. अशा सामान्य कुटुंबातून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्याने यु. पी. एस. सी. परिक्षेत उज्ज्वल यश मिळवित मोठी मजल मारली आहे. तुषारच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










