वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘ग्लोबल पीस कौन्सिल’ आणि ‘इंटरनॅशनल ह्युमन राईट्स’ यांच्यातर्फे कोकणचे सुपुत्र तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांना प्रतिष्ठेचा “महात्मा गांधी नोबेल नॅशनल अवॉर्ड – २०२६” (Mahatma Gandhi Nobel National Award) प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
हा पुरस्कार आचार्य लोकेशजी मुनी आणि अविनाश संकुडे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. मनीष दळवी यांनी आजवर केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान देण्यात आला आहे. या बहुमानाबद्दल भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सिंधुदुर्ग बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी, मान्यवर, नागरिक तसेच विविध संस्था व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.












