कणकवली तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ

मा.आ जिल्हाप्रमुख वैभव नाईक व कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शिवसेना शाखा येथे करण्यात आला. सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी मा.आ. वैभव नाईक यांनी केले.

मा.आ. वैभव नाईक म्हणाले, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेना कार्यरत आहे. महाराष्ट्र हितासाठी शिवसेनेने अनेक वेळा विरोधात राहून संघर्ष केला आहे.लोकांची छोटी मोठी कामे करण्याचे शिवसेनेचे ध्येय आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढा देत असून शिवसेनेने कधीही सत्तेसाठी आणि राजकारणासाठी हिंदुत्वाचा गैरवापर केलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध तरुण वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. त्या आंदोलनांना शिवसेनाच न्याय देऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणीत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, तालुकाप्रमुख राजू राठोड, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, नगरसेवक संकेत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,बबली राणे, हर्षद गावडे, विलास गुडेकर,ओमप्रकाश ताम्हाणेकर, तेजस राणे, माधवी दळवी, रंजना कोलते, दिव्या साळगावकर, रोहिणी पिळणकर, अर्पिता परब, रचना खांदारे, प्रतीक्षा साटम, साक्षी आमडोसकर, शोभा बागवे, जगन्नाथ आजगावकर, रमाकांत राणे, विठोबा मर्ये, सुरेश मोरे, वैभव सावंत, रवींद्र खांदारे, रमेश गावकर, संदीप वारंग, आनंद महाडेश्वर, महेश कोदे, स्वप्निल पाटील, महादेव राठवड आणि यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!