व्ही. एन. नाबर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

बांदा (प्रतिनिधी) : वाढते तापमान आणि पावसाने वाढवलेली चिंता यामुळे जलस्रोत टिकवण्यासाठी व्ही. एन. नाबर स्कूल बांदा शाळेतील इयत्ता ८ वी, ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून दोन वनराई बंधारे निशाणी बांदा येथे बांधले बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरते व त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सहभागामुळे पर्यावरण संवर्धन, जलसंधारण तसेच श्रमदान याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजले. तसेच “आज पाणी अडवूया, उद्यासाठी पाण्याची बचत करूया” हा संदेश मुलांनी दिला.

या उपक्रमासाठी माजी उपसरपंच राजाराम सावंत यांचे सहकार्य लाभले. यावेळी बांदा केंद्रप्रमुख श्री. पाटील, बांदा उपसरपंच आबा धारगळकर, बांदा ग्रामपंचायत, माजी उपसरपंच राजाराम सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य गजानन गायतोंडे, माजी सरपंच अशोक सावंत, शाम मांजरेकर, ग्रामपंचायत कर्मचारी संजय सावंत, संतोष कविटकर, ज्येष्ठ नागरिक अरुण मोर्ये, हरी मांजरेकर, निवास मोर्ये, प्रविण सावंत, परशुराम सावंत यांनी सहभाग घेतला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई, सहाय्यक शिक्षक रसिका वाटवे, वेलंकी पेडणेकर, प्रशांत देसाई, शिक्षकेतर कर्मचारी प्रकाश झांटये व वेदिका मलिक यांनी सहभाग घेतला.

error: Content is protected !!