चिंदर अपराजकोंड शाळेचा दुष्काळ निवारणासाठी खारीचा वाटा; पालक, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
आचरा (प्रतिनिधी) : भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाचे महत्त्व ओळखून सेवा संकल्प अभियानांतर्गत चिंदर अपराज कोंड शाळेच्या वतीने चिंदर अपराज वाडी येथे बंधारा उभारण्यात आला. पाणीटंचाईवर मात करून जलसाठा वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून शाळेने सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळ निवारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या उपक्रमा वेळी संतोष मो अपराज, सागर अपराज, शंकर अपराज, सर्वेश अपराज, प्रथमेश अपराज, विराज सावंत, महेश पांचाळ, रोशन अपराज, रमाकांत, संतोष अपराज, समृद्धी अपराज, पूर्वा अपराज, दीपिका नाईक, सुवर्णा अपराज, छाया अपराज, गीता पाटणकर, शिसाळ मॅडम, चव्हाण मॅडम आणि धोत्रे सर यांच्या सामूहिक सहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला. बंधारा उभारणीसाठी पालक आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, परिसरातील नागरिकांसाठी तो प्रेरणादायी ठरत आहे.
लोकसहभागातून जलसंधारणाचा संदेश देणारा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकतेचेही प्रभावी दर्शन घडविणारा ठरला.












