काळसे येथे अक्षरलेखन कार्यशाळा, श्री शिवाजी वाचन मंदिरचा उपक्रम
चौके (प्रतिनिधी) : श्री शिवाजी वाचन मंदिर, काळसे आणि पंचक्रोशीतील प्राथमिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त काळसे-परबवाडी प्राथमिक शाळेत अक्षरलेखन कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांना देवनागरी लिपीतील सुंदर, सुबक व वळणदार अक्षरलेखनाचे प्रशिक्षण देणे हा कार्यशाळेचा उद्देश होता. ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षक सन्मा शंकर प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पंचक्रोशीतील पाच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी श्री शिवाजी वाचन मंदिराचे अध्यक्ष केशव सावंत, सचिव तुकाराम प्रभू, चारुलता काळसेकर, शिवनंदन प्रभू आणि हरेश आंग्रे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा धामापूर बौद्धवाडा चे मुख्याध्यापक अंकुश कनेरकर सर यांनी केले त्यावेळी शाळा काळसे नं ०१ चे मुख्याध्यापिका मिलन नेरुरकर मॅडम, शिक्षण सेवक सृष्टीका इरपाजी मॅडम, शाळा- काळसे बागवाडा चे मुख्याध्यापक लक्ष्मण आकेरकर सर, शिक्षणसेवक स्वाती बोडखे मॅडम, काळसे भंडारवाडा चे मुख्याध्यापक सिद्धार्थ नेरुरकर सर, उपाशिक्षक रमाकांत सोनसुरकर सर, काळसे धामापूर शाळेचे मुख्याध्यापिका माधुरी फुंडे मॅडम, शिक्षणसेवक बिना तडवी मॅडम आणि धामापूर बौद्धवाडा च्या शिक्षणसेवक शितल लोखंडे मॅडम तसेच सर्व प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.













