सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पत्रकार प्रदीप भोवड (वय ५७) यांचे विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. ते मूळचे वैभववाडी येथील असून कामानिमित्त कुटुंबासह विरार येथे वास्तव्यास होते. विरार पूर्व, फुलपाडा येथील वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोवड यांनी विविध प्रमुख दैनिकांमध्ये वार्ताहर, उपसंपादक अशा पदांवर काम करत पत्रकारितेत योगदान दिले. गोवा राज्यातही त्यांनी पत्रकारिता केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि ज्येष्ठ बंधू पत्रकार जगदीश भोवड, सुनील भोवड असा परिवार आहे.
पत्रकार प्रदीप भोवड यांचे निधन












