झुंझार मित्र मंडळ खारेपाटण आयोजित नवरात्रोस्तव – २०२६ निमित्त

विविध सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमाचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक, सांस्कृतिक, शैशणिक, क्रीडा व आरोग्य आधी विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या खारेपाटण येथील झुंझार मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नवरात्रौत्सव -२०२६ चे शानदार आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी दिली.

खारेपाटण शिवाजीपेठ येथील श्री देव विष्णू मंदिरात झुंझार मित्र मंडळाच्या वतीने देवीची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली असून आकर्षक विद्युत रोषणाईने येथील परिसर खुलून दिसत आहे. तर दि.११ ऑक्टोबर २०२६ ते दि.२१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि.१३ रोजी भारतीय डाक विभाग सिंधुदुर्ग यांच्या वतीने आधार अपडेट कार्ड मेळावा घेण्यात आला. तर रात्री ९.०० वाजता गोवा येथील घुमट वादन आरती घेण्यात आली. तसेच दि.१४ रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्र अर्थात फार्मर आय डी कॅम्प घेण्यात आला. याच दिवशी श्रीसुक्त अनुष्ठान, महाआरती व मंत्र पुष्पाजली घेण्यात आली. या सर्व कार्यक्रमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दि.१५ रोजी लकी ड्रॉ या माध्यमातून महिला – पुरुष, लहान मुले यांना वास्तुरूप गिफ्ट वाटण्यात आले.

तसेच दि.१६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा महिला दशावतार नाट्य मंडळाचा वज्रासुर”कालिका महात्म” ही नाटिका रात्री ९.३० वाजता सादर होणार आहे. दि.१७ रोजी डोळे तपासणी शिबिराचे सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. व १८ रोजी एस टी महामंडळात महिलांना प्रवासासाठी लागणारी प्रीपेड कार्ड कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. व १७ रोजी रात्री १० वाजता भव्य ढोल वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम क्रमांक २५००० द्वितीय – १५०० तृतीय – १००० रोख बक्षीस व आकर्षक चषक देऊन संघाना गौरविण्यात येणार आहे. सहभागी संघाना २००० रुपये गाडी भाडे देखील देण्यात येणार आहे. तर दि.१९ रोजी विशेष आकर्षण असलेला व ८० स्त्री व पुरुष यांचा सहभाग असलेला सुरज गोडवे व सुमित रोडी प्रस्तुत महिषासुरमर्दिनि नवदुर्गाचा अवतार भव्य दिव्य टाळनृत्याचा कार्यक्रम खारेपाटण एस टी बस स्थानक येथे सादर करण्यात येणार आहे. तर शेवटच्या दिवशी सर्व नागरिकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच प. पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या सौजन्याने हिपॅनोटिझम हा कार्यक्रम मंडळाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष संकेत शेट्ये यांनी केले आहे.

error: Content is protected !!