शेर्लेत अग्नितांडव | किराणा दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : शेर्ले येथील धुरी ट्रेडर्स या एकनाथ शंकर धुरी यांच्या किराणा दुकानाला शनिवार 17 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. दुकानाला आग लागल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दुकानमालकाला याबाबत माहिती दिली. तसेच बांदा पोलिसांनाही घटनेची खबर देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तरी प्राथमिक अंदाज आग शाॅर्ट सर्किट मुळे लागली असावी असे वर्तविण्यात येत आहे.

दुकानातील साहित्याने पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. आगीची तीव्रता लक्षात घेता कुडाळ व वेंगुर्ला येथील अग्निशमन दलांनाही पाचारण करण्यात आले होते.बांदा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय धुरी व दत्ताराम पालकर यांनी पंचनामा केलेला आहे यावेळी केरला सरपंच श्रीमती जाधव उपसरपंच नाईक पोलीस पाटील व ग्रामस्थ तसेच विद्युत मंडळाचे वायरमन उपस्थित होते

दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले . सकाळ पर्यंत आग विझवण्यात यश आले.
या आगीत दुकानातील लाकडी फर्निचर फ्रिज वजन काटे मिरची कांडप मशिन तसेच किराणा मालाचे साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजले नसले तरी आग शॉर्ट सरकीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या आगीत धुरी यांचे सुमारे पंचवीस ते तीस लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

error: Content is protected !!