देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारण्यात येणाऱ्या नयनरम्य उद्यानाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला
देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि समुद्राचे विहंगम दर्शन यांचा संगम असलेले हे उद्यान देवगडच्या पर्यटन आकर्षणात भर घालणार आहे. यासोबतच स्थानिक रोजगार आणि पर्यटनपूरक व्यवसायांनाही चालना मिळेल.
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नंदकुमार घाटे, सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी हरिदत्त माने, महिला बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, गटनेते शरद ठूकरूल, स्वच्छता व आरोग्य सभापती बुवा तारी, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, दयानंद पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, भाजप तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, इंजिनिअर अभिजित कामत, उल्हास मणचेकर, प्रकाश राणे, डॉ. सुनील आठवले, देवगड पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक संतोष उगलमुगले, दिनेश कुमार बागुल (अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ तथा सिंधुदुर्ग कार्यकारी अभियंता), शैलेश मोरजकर (उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देवगड), अविनाश पवार (कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देवगड) आदी उपस्थित होते.












