ऍड.विलास परब, ऍड.तुषार परब यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : शिराळे वैभववाडी येथील विठ्ठल बाबू शेळके यानी त्यांच्या घरी शिराळे शेळकेवाडी पासून जाणाऱ्या पायवाटेवरील पावसाने वाहून आलेली माती फावड्याने साफ केली या रागातून दिनांक १/११/२०१९ रोजी तेथीलच बमू शेळके, मनोहर शेळके व महेंद्र शेळके यानी सायंकाळी ७ वाजता विठ्ठल शेळके यास वाटेत अडवून माती का साफ केलीस असे विचारून एकमेकाच्या संगनमताने दांड्याने डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर मारहाण केली तसेच डोकीला लावायच्या बॕटरीने विठ्ठलला मारहाण करुन दुखापत केली व ठार मारणेची धमकी दिली त्यावेळी विठ्ठलच्या पत्नीने धावत येऊन सोडवासोडव केली अशा आशयाची फिर्याद विठ्ठल शेळके याने वैभववाडी पोलीस ठाणे येथे दिली. त्यावरून आरोपीविरूध्द भा.द.वि.कलम 323, 324, 504,506 व 34 नुसार गुन्हा दाखल होऊन पोलीसानी कणकवली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदरचा खटला मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचेसमोर चालला असता एकूण सहा साक्षिदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. परंतु आरोपींवरील मारहाणीचा गुन्हा शाबीत होणेस पुरेसा पुरावा न आढळलेने , आरोपीच्या वकीलानी घेतलेल्या उलटतपासणीतून साक्षीदाररांच्या जबानीतील अनेक विसंगती, पूर्वीची वाकडीक यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोंपीतर्फे ॲड विलास परब व ॲड तुषार परब यानी काम पाहीले.










