कणकवलीतील स्वयंभू मंदिराला भेट
कणकवली (प्रतिनिधी) : त्रिपुरारी जत्रोत्सवानिमित्त पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली येथील श्री देव स्वयंभू मंदिराला भेट देत श्री देव स्वयंभूचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री देव स्वयंभूच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, जाणते सदानंद राणे, अंबाजी राणे, नगरसेवक बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, अभय राणे, बंडू गांगण, शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर राणे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरात दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती होती. या धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री देव स्वयंभूचे दर्शन घेतले.














