कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कलमठ येथील श्री काशीकलेश्वर त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी यात्रोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी श्री काशीकलेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरात नतमस्तक होत देवाचे आशीर्वाद घेतले. तसेच यात्रोत्सवानिमित्त उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कलमठ येथे धार्मिक उत्साहाचे वातावरण होते. श्री काशीकलेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची उपस्थिती होती. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी मंदिराला भेट देत दर्शन घेतल्याने उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, सुनील काका नाडकर्णी, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य गुरू वर्देकर, सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, रामदास विखाळे, तनोज कळसुलकर, साबाजी गुरव, स्वप्नील चिंदरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.














