श्री कुर्ला देवीच्या चरणी पालकमंत्री नितेश राणे नतमस्तक

यात्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील श्री कुर्ला देवीच्या त्रिपुरारी पौर्णिमा यात्रोत्सवानिमित्त पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी उपस्थित राहून श्री कुर्ला देवीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवीचरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रोत्सवात भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी भाविकांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. श्री कुर्ला देवीचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, जयेंद्र रावराणे, बंडू पाटील, अंबाजी हुंबे, राजेश राणे, दिलीप पाटील, जयंत रावराणे, दीपक कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!