पडेल पेट्रोलपंपानजिक भीषण अपघात

सौंदाळे येथील मोटरसायकलस्वार वृषाल गुरव जागीच ठार

देवगड (प्रतिनिधी) : पडेल कॅन्टिन येथून भरधाव वेगाने जाणऱ्या मोटरसायकलची समोरून येणाèया अमेझ होंडा कारला समोरून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार वृषाल संतोष गुरव(२५) रा.सौंदाळे गुरववाडी हा जागीच ठार झाला.हा अपघात शनिवारी दुपारी दीड वाजण्याचा सुमारास पडेल पेटड्ढोलपंपानजिक विजयदूर्ग तळेरे मार्गावर झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, सौंदाळे गुरववाडी येथील वृषाल गुरव हा युवक हा शनिवारी दुपारी मोटरसायकलने पडेल कॅन्टिन येथून सौंदाळे येथे त्याचा गावी जात होता.दरम्यान सांगली येथील कुटूंबीय कोकण पर्यटनासाठी अमेझ होंडा कारने निघाले ते गगनबावडा येथून विजयदूर्ग येथे येत होते.दरम्यान भरधाव वेगाने जाणाèया वृषालच्या मोटरसायकलची अमेझ कारला समोरून जोरदार धडक बसली.या अपघातात मोटरसायकलस्वार वृषाल हा रस्त्यावर \ेकला जावून त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होवून त्याचा जागीच मृत्यु झाला.अपघाताची बातमी समजताच पडेल कॅन्टिन येथील नागरिक व व्यापारीवर्गाने अपघातस्थळी धाव घेतली.याबाबत विजयदूर्ग पोलिस स्टेशनला कळविण्यात आले.विजयदूर्ग पोलिस स्टेशनचे अ‍ेपीआय भारतकुमार \ार्णे, पोलिस उपनिरिक्षक भालेराव, पोलिस हवालदार अवधुत गुणीजन, बिर्जे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.घटनेची माहिती समजताच सौंदाळे येथिल ग्रामस्थही घटनास्थळी व देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल झाले.

अपघातातील मयत वृषाल हा कामधंदा करून आई-वडील यांच्यासमवेत राहत होता.त्याला एक बहिण असून तिचे या महिन्यातच लग्न झाले.वडील आंबा बागायतदार असून वृषाल हा पडेल कॅन्टिन येथे काही कामानिमित्त गेला होता.घरी परतत असतानाच त्याच्यावर काळाने घाला घातला व आईवडीलांचे एकुलते एक छत्र हरपल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!